STORYMIRROR

Deepali Mathane

Romance Fantasy

3  

Deepali Mathane

Romance Fantasy

स्वप्न माझे

स्वप्न माझे

1 min
374

स्वप्नांचे दीप माझ्या

तू उजळून घेशील का ?

मर्म बंधातली ठेव ही साजणा

हे स्वप्न माझे साकारशील का ?

  असंख्य चांदण्यातला तू

   माझा ध्रुव तारा होशील का ?

   माझ्या मनातले अढळपद तू

  हे स्वप्न माझे साकारशील का ?

बेभान वादळातला तू

किनारा माझा होशील का ?

विसावेनं मी तिथे साजणा

हे स्वप्न माझे साकारशील का ?

   रक्तबंबाळ काटेरी वाटेवरती

    माझ्या सवे चलशील का ?

   मिळेल कधीतरी हवा तो विसावा

    हे स्वप्न माझे साकारशील का ?

नकोय रे खूप काही मला कधीच

फक्त तू सोबत असशील का ?

ही जाणीव सुखवेन मला सदैव

हे स्वप्न माझे साकारशील का ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance