मोहमयी राधिका
मोहमयी राधिका
मोहमयी राधिका ती
क्रिष्णमयी भासते
प्रेममयी धून तिच्या
हृदयातच हासते
निःस्वार्थी प्रेम ते
जेव्हा हृदयी अंकुरते
निःशब्द भावनेचे
गीत ओठी झंकारते
राधाकृष्ण नाव दोन
एक रूप जाहले
एकमेकात दोघांनी
प्रतिबिंब पाहले
बासरीच्या सुराने
मन तिचे वेडावले
रास खेळतांना तिचे
भाव हे नादावले
कुंजवनात प्रीतही
राधाकृष्णाची बहरली
क्रिष्णरुप राधिका मग
अंतरंगी मोहरली
शुद्ध प्रेमाची प्रतिमा
राधिकेतच विरली
राधेकृष्ण बोलण्याची
मग रीत जगाने धरली

