प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे प्रेमच असतं
कभी किंवा जास्त नसतं
दिसलं नाही कधी म्हणून
कर्तव्यातून पाझरत असतं
सोनेरी क्षणांच मनात
दाटलेलं जाळं असतं
त्यातच अडकून रहावं असं
आपलसं एक बंधन असतं
प्रेम म्हणजे क्षितिजाच्या पार
वसलेलं एक आपलं गाव असतं
दोन ध्रुवांच्या मनोहर मिलनाचं
स्वच्छ सुंदर प्रतीक असतं

