सुख म्हणजे
सुख म्हणजे
सुख म्हणजे ऊन सावली
जाणीव होता मनाला
भावलेली एक कल्पना
त्रुप्त करि अंतर्मनाला.....
सुख म्हणजे फुलवित जाणार
चैतण्याच लोभस चांदणं
ज्याने सुखावतील ऐसी
दुखावलेल्या जीवाची स्पंदनं.....
सुख म्हणजे निर्व्याज साथ
लाभलेला आनंद घन
दु:खावरती घालूनी फुंकर
त्रुप्त करि हे अवघे मनं........
सुख म्हणजे मधूर धून बासरीची
वाजवितो जणू क्रिष्ण सावळा
तल्लीन होऊनी जाती गोपिका
क्रिष्णरूप होऊनी घननिळा...
