एक झोका
एक झोका
एक झोका आठवणींचा
उंचावला अंतरीच्या चांदण्यात
प्रत्येक आठवणीची सुटलेली
हरवला ती गाठ बांधण्यात
एक झोका घेऊन उडे
मज साठवलेल्या पापण्यात
आसवांच्या सोबतीने
ओघळून साठला मनात
एक झोका विसावलेल्या
गुंतलेल्या सुखस्वप्नात
घेण्या कवेत आकांक्षांना
पंख साठवूनी मनात
एक झोका धुंद वाऱ्यावर
बेभान जाहला आकाशात
आनंदघन उफाळून येई
माझा विसावून अवकाशात
एक झोका उंचावला
अंतरंगी अंतरंगात
आठवणींची फुले
उधळून मना-मनात
