सोनसळी किरणे
सोनसळी किरणे
सोनसळी किरणे दिसली
अलवार पाण्यावर उतरताना
केशरी गंधातली पहाट
दिसली मज सजताना
पक्षांची किलबिल काननी
ऐकली केशरी सडा शिंपताना
रानातील पक्षी दिसले
नदी काठावर पाणी पितांना
सोनसळी किरणांची आभा
नटली पहाट होताना
अवनीचे ते रंग उधळले
पहाट वारा छेडतांना
अलवार उतरती पाण्यात
किरणांचे प्रतिबिंब पाहताना
मन प्रफुल्लित जाहले
तरंग पाण्यात उठतांना
जपून ठेवू या अंतःकरणात
गोजिऱ्या सोनकळी किरणांना
लक्षवेधी मनमोहक अशा
अलवार पाण्यावरच्या क्षणांना
