फुले
फुले
फुले बहरली परसात
धुंद सुवासांची बरसात
मोगरा तो डोकावतो
मनी भर पावसात
नाजूकशा कळ्या
ओल्या चिंब पावसात
उद्या उमलती पहाटेस
मोहरत्या अंगणात
लाल-गुलाबी फुले
उमललीअंगणात
इंद्रधनू उतरला
माझ्या नभांगणात
सुखावले पानो-पानी
फुल निरागस हास्यात
ओथंबून आले नभ
गंध दरवळला श्वासात
इवली इवली रोपे
हरखली सरींच्या मायेत
विसावली सारी सुखाने
गर्द वृक्षांच्या छायेत
