STORYMIRROR

prajakta birari

Others

4  

prajakta birari

Others

दृष्टीहिन

दृष्टीहिन

1 min
400

जात होते जरा कुठेशी

 उदास होते 'मन' ते उगाच 

लागत नव्हता सुर सुराशी 

समे वरती उभा तसाच .....


तोच थबकले माझे पाय 

पाहून त्यांना खेळतांना 

नूर माझा लगेच बदलला

 बालपणात शिरतांना......


 त्यांचं हसणं त्यांच खिदळणं 

आकाशात उडलं होतं

त्यांच्या जल्लोषाला माझं मन

 केव्हाच जाऊन भिडलं होतं.....


 जाडजूड एका दोराशी

 सुरू होती रस्सीखेच 

पडझड जरी होत होती 

हार-जिते चा नव्हता पेच.......


दोन्हींपैकी एकही बाजू

 दिसत नव्हती लेचीपेची

 जीवाच्या आकांताने

 चालू होती खेचाखेची ......


जिंकण्याची उमेद होती 

पण हरण्याचे भय नव्हते

 हत्तीचे बळ इथे 

आजमावले जात होते .....


एकाच्या हातून दोर

 निसटुन पडला तो खाली

 चाचपडू लागले हाताने सारे

 शोधण्या त्याला भवताली ......


अंधार पाहून त्यांच्या पुढचा

 चरचर काळीज माझे चिरत गेले

 निमिषातच ओसंडणार्या शब्दांनी त्यांच्या

 कानांना माझ्या जागे केले.......


 जखमेवरची खपलीचीही

 किती काळजी घेतो आपण

जखमांसोबत जगत हसत आहेत

 या जगात कित्येक जण .......


लाडावलेल्या मनापुढती 

मान टाकते आमची कॉलर 

मनावरती राज्य करता ते

 नाही कारुण्याची झालर .....


दृष्टिहिन आहेत ते

 दृष्टी 'हीन' नाही त्यांची

 तपासून पहा जरा आत

सरळ आहे का नजर आमची....


Rate this content
Log in