सांगते ऐका
सांगते ऐका
पानभर भाषण
संक्षिप्तांच्या ओठी
सृजनाचा गर्भ
विक्षिप्तांच्या पोटी
घर तिथे शौचालय
शौचालय तीथे नेट
सुविधा कशा थेट
पुरविल्या
पाच वर्षाचा सूर्य
पाच वर्षाच कॅलेंडर
वाटता येतील तितके
वाटा रे सिलेंडर
सांगत नाही कुणी
पण शंका येते अगोदर
म्हैसाळच्या वाटेवर
दिसता गरोदर
बॅंका घरे गाव शाळा
सारे डिजिटल
आपण माणसाची फक्त
काॅपी 'फिजिकल'
आय पी एस च्या घरच लग्न पाहून
डोळ्याच पारणं फिटल
लक्ष्मी व सरस्वती यांच
बहूदा भांडण मिटल
कितीही अलंकार घ्या
स्त्रीला कमीच पडताय
एकट्या अतिशयोक्ती अलंकारावर
सर्व न्यूजचॅनल जगताय
शापित संस्कृती अन्
छापील धरोवर
पाण्यात गर्भ
गाफील सरोवर
