STORYMIRROR

prajakta birari

Inspirational

4  

prajakta birari

Inspirational

नागरीकांची कर्तव्ये

नागरीकांची कर्तव्ये

1 min
158

काय म्हणता घडवायचीयत

उद्याच्या पिढीची भवितव्ये

हक्कासाठी लढणारे आपण

हमखास विसरतो कर्तव्ये


सुट्टी घेतो मजा करतो

करत नाही मतदान

अंगणापुरते राबवतो

स्वच्छतेचे अभियान


कर चुकवणे‌ भ्रष्ट वागणे

सांगा आपणास शोभते का?

बालमजूरांच्या फटाक्यांनी

दिवाळी साजरी होते का?


आजूबाजूला घडतो अन्याय

आपण करतो कानाडोळा

साक्ष द्यायची वेळ येता

पोटात उठतो गोळा


हवा पाणी जमीन आकाश 

जपून वापरावा निसर्ग

प्रदूषणाचा विळखा वाढून

वाढेल रोगांचा संसर्ग


फायद्यासाठी देतो घेतो

लाचलूचपत चिरीमिरी

वाहतूकीच्या नियमांनाही

बसवून देतो धाब्यावरी


प्लास्टीकबंदी सरकारनेच करावी

अशी आपली सक्ती का?

पर्यटनस्थळ स्वच्छ ठेवणे

एवढी नको भक्ती का?


शिक्षणाचा अधिकार दिलवणे

आपले काम नाही का?

योजनांचा योग्य वापर

खरंच एवढे कठीण आहे का?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational