मातीत गाळलेला घाम रे
मातीत गाळलेला घाम रे
1 min
609
माझे ते शिवार| जमीन सुपीक|
मुबलक पिक|भरघोस||
मातीत गाळला| देहाचा मी घाम|
मिळे मला दाम| सोन्या वाणी||
दिले मला त्याने| कष्टाचे ते फळ|
नाही दिली झळ| दुष्काळाची||
सर्जा राजा माझे| असती सोबती|
शेतात राबती| बरोबर||
ऊस भुईमूग|सोयाबीन भला|
आवडतो मला| हरभरा||
शिदोरी घेऊन| येई मालकीण|
वाटे पाठलीण|लई गोड||
नित्य मिळे गोड| श्रद्धे चे ते फळ|
आनंद निखळ| देव देती||
करतो नी प्रेम| माझ्या शेतावर|
भक्ती देवावर| नेहमीच||