STORYMIRROR

Shabana Mulla

Others

3  

Shabana Mulla

Others

रंग मनाचे

रंग मनाचे

1 min
602


समजूत मनाची घालावी किती

त्याच्या हट्टीपणाची वाटते भीती


वाटे आज मनाला भरारी घेऊ

आकाशात भ्रमण करुन येऊ


संगीताच्या सुरा संगे धुंद होऊ

तारा मनातल्या जुळवून घेऊ


कधी वाटे रेखाटावे चित्र नवे

रंग भरू त्यात जे मनाला हवे


कवी मन माझे उदयाला आले

शब्दांसंगे रमून खुलून गेले


मनाला माझीया क्षेत्र गवसले

आनंदाने त्याने ते स्वीकार केले




Rate this content
Log in