STORYMIRROR

Shabana Mulla

Romance

3  

Shabana Mulla

Romance

नकळत सारे घडले......

नकळत सारे घडले......

1 min
984


अबोल प्रित आपली गुंफता

घट्ट नाते हे नयनांशी जडले

इशाऱ्याची भाषा कळली तुला

बघ कसे नकळत सारे घडले


नजरानजर तुझ्याशी होता

काळीज माझे रे धडधडले

वाटे स्वप्नवत हे सारे मजला

कसे नकळत सारेच घडले


अल्लड मी प्रीतीत साजणा

तुझ्याकडे कशी मी ओढले

तुझ्या बाहुत रे विलीन होता

आज हे नकळत सारे घडले


धुंद होता प्रीतीत तुझ्या मी

सुंदर स्वप्न मला हे पडले

हात हाती मी दिला तुझ्या रे

पुन्हा नकळत सारे घडले


ओथंबलेले भाव माझ्या मनीचे

हृदयाला तुझ्या जाऊन भिडले

मोहरून गेले तुझ्यात सख्या मी

प्रीयतमा नकळत सारे घडले


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Romance