व्यसनमुक्ती
व्यसनमुक्ती
आई-बाबा सांगे| चांगली संगत||
असावी रंगत| आयुष्यात||
दारूचे व्यसन|शरीराचा नाश||
गळ्याला तो पाश| जीवनाचा||
गुटखा तंबाखू|त्रास जबड्याचा|
रोग कॅन्सरचा| नका घेऊ||
सिगारेट गांजा|धुर करे किती|
होई मग माती|फुप्फुसाची||
रंगा रंग करी| माव्याची सुपारी|
दुर्गंधी पसरी| सर्वीकडे||
सोडूनी व्यसन| आयुष्य फुलवा|
स्वतःला घडवा| नेहमीच||