STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

क्रुरता...!

क्रुरता...!

1 min
225


काही काही वेळेला

परमेश्वर पण क्रूर होतो

अस आपल्याला वाटत...

जेव्हा त्याच आणि आपलं

नात तुटत

गणित चुकत...

सत्य कटू असतं

पचनी पडण अवघड असतं

तेव्हा आपल्याला

त्याच्या क्रूरतेच दर्शन होतं...

वाटत

ही अवकृपा

आपल्याच 

वाट्याला का..?

पण 

खर सांगू मित्रांनो

पडत्या फळाची आज्ञा मानावी

हे खरं आहे

जे जे होत ते ते सारं

आपल्या भल्यासाठीच असत...

इतकं मात्र खरं

तरी पण

तो आपली इच्छा पूर्ण करतो

या ना त्या रुपात दर्शन देतो...

वेळ निभावून नेतो

हे काही खोटे नाही

अगदी अनपेक्षित 

यशासारखे...

एखादी जुनी इच्छा

वर डोकं काढावी

आणि

त्यानं ती पुरी करावी अगदी तसं...!

तेव्हा मात्र त्याच्या

अवकृपेची क्रुरता

धुमठोकून पळून जाते

अवकृपेचे कृपेत रूपांतर होते

आणि

इच्छापूर्तीचे समाधान मिळते...!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational