सूर्य आणि चंद्र
सूर्य आणि चंद्र
सूर्य प्रकाशाने उजळले सारे हे गगन आकाश ..
पुरवितो सर्वांना स्वच्छ सुंदर प्रकाश ..
हरितद्रव्य तयार करतात वृक्ष वल्ली साहाय्याने सूर्य प्रकाशाच्या...
देतात छाया, पुरवतात अन्न, मिळतो पाऊसही साहाय्याने सूर्य प्रकाशाच्या..
साथी असतो सूर्य दिवसाचा..
तर साथी असतो चंद्र रात्रीचा..
झगमगुन जाते सारे जग प्रकाशाने...
कधी चंद्र तर कधी सूर्याच्या साहाय्याने..
शीतल छाया पुरवतो चंद्र...
करतो सर्वांना आपल्या प्रकाशात धुंद..
चोरांना ठेवतो दूर आपल्या पासून..
आळा घालतो चोरी वर कंबर कसून..
विचार ही नाही करता येत सूर्य चंद्र वाचून..
कसे जगू आपण जीवन यांच्यावाचून?
अंधारून जातील सारे जग आपले..
नसेल प्रकाश तर काय होईल आपले..
न्यारी आहे ही किमया सृष्टीची..
देणगी ही न्यारी पृथ्वीची...
स्त्रोत आहेत सूर्य चंद्र प्रकाशाचे. .
सारे जीवन अवलंबून आहे त्यावर माणसाचे...
