STORYMIRROR

Suchita Kulkarni

Inspirational

4  

Suchita Kulkarni

Inspirational

स्वप्नांची दुनिया

स्वप्नांची दुनिया

1 min
635

स्वप्नाची दुनिया आहे खूप भारी

मनातले भाव दिसतात सारी


मनातील भाव स्वप्नी उतरती

कल्पनेच्या हिंदोळ्यावर झुलती


साद घाली मना मनातील भाव

चल बघू सख्या स्वप्नातील गाव


आकाशी ढगांशी करू म्हणे दोस्ती

लपाछपी खेळू म्हणे करू मस्ती


आकाशीचा चंद्र खुणावतो मला

तारका समवेत खेळू म्हणाला


अलगद उडाले पंख लावूनी 

कवेत घेतले जवळ येऊनी


प्रेम तुझे माझे स्वप्नातच भासे

वास्तवाचे भान मात्र मला नसे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational