STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

4  

Pandit Warade

Inspirational

खेळ जीवनाचे

खेळ जीवनाचे

1 min
235


भास की सत्य स्वप्न उद्याचे

भाव नयनी सुखी संसाराचे।।धृ।।


एक घरटे मिळाले सुंदर

मखमली सुखाची चादर

सोहळे चालले या जीवाचे।।१।।


एक अपेक्षा या जीवाची

दृष्ट ना लागावी कुणाची

खेळ होऊ नये जीवनाचे।।२।।


खेळ दैवाचा कळे कुणाला

लिहिलेले काय प्राक्तनाला

काय पाहिले कोणी उद्याचे।।३।।


दुःखेच का येती वाट्याला

सोडती का सुखे मानवाला

सिद्ध आहेत दूत त्या यमाचे।।४।।


भोग असतील जे नशिबात

ते सारेच भोगावे लागतात

सार हेचि असे या जीवनाचे।।५।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational