शब्द:- सुर्य /चंद्र/प्रेमी
शब्द:- सुर्य /चंद्र/प्रेमी
चंद्र आणिक तारे सांगा
कुठूनी बरे ही आली
सुर्यदेव हे घरी पोहोचता
खेळावया निघाली
खेळावया निघाली
निरभ्र नभांगणात
भेटीला मग आला त्यांच्या
वेडा एक प्रेमदुत
वेडा एक प्रेमदुत
एकटा चांदण्यात तो फिरे
प्रियतमेची वाटं बघंत तो
मोजीत होता तारे
मोजीत होता तारे
त्याच्या चंद्र सोबतीला
एका प्रेमदुताला जणू
दुसरा प्रेमदुत भेटला
दुसरा प्रेमदुत भेटला
प्रियेच्या भेटीचा तो साक्षी
हातात हात घेऊनी प्रियेचा
पाहतो नभातील नक्षी
पाहतो नभातील नक्षी
बसुनी शितल चांदण्यात
एकमेकांच्या सोबतीने
स्वप्न भविष्याची पहात
