STORYMIRROR

Vijay Sanap

Inspirational

4  

Vijay Sanap

Inspirational

छंद

छंद

1 min
378

आहे मला थोडा फार

लिहिण्याचा एक छंद

माझ्या मनाला मिळतो

खरा त्यातून आनंद ।।


नाही करीत कुणाची

कधी टिंगल टवाळी

चार बोलणे ऐकण्याची

नाही येत कधी पाळी ।।


नको नको म्हटलं तरी

हात तिकडं वळतात

जरी काही नाही लिहिलं

तरी लोक जळतात ‌‌।।


छंद माझा जोपासतो

काम माझे सांभाळून

काय मिळते इतरांना

विना कारण जळून ।।


लोक असे का वागतात

मला हेच नाही कळत

चुगल्या करणं दुसऱ्याच्या

काहून नाही टाळत ।।


लावा लावी भांडा भांडी

द्यावी म्हणतो सोडून

काय सार्थक होईल

या भानगडीत पडून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational