एकटा
एकटा
माणसाच्या कोंडाळ्यात माणूस हा एकटा
कधी शोधतो आसरा
कधी शोधतो किनारा...,
त्यास जेंव्हा धीर हवा
तेंव्हाच दगा देते दुनिया
माणसाला माणसाची
साथ हवी असते जेंव्हा,
काय मिळते वागण्याने अशा
माणसाला ठाव नाही
भ्रम आहे माणसाचा की
त्याला साथ हवी,....
माणसाच्या कोंडाळ्यात ,
माणूस हा एकटा हवा
काय कामाचा तो ,माणसावर
निष्काम हसणारा थवा.....
