मिळवा समाजात बहुमान
मिळवा समाजात बहुमान
पालकांनी केलेले संस्कार
बाहेरच्या जगाशी संपर्क आल्यावर
जातात कुठे?
वेगवेगळ्या प्रसंगी
वेगवेगळे प्रेरणास्थान...
नीतीमत्ता ढळते आपली
वाटता स्मरावे पालकांना
पालकांनी केलेल्या संस्काराची
ढाल पुढे करत
कठीण प्रसंगाला सामोरे जात
मिळवा समाजात बहुमान!!!