STORYMIRROR

SANJAY SALVI

Inspirational

4  

SANJAY SALVI

Inspirational

अरे उनाड पावसा ...

अरे उनाड पावसा ...

1 min
567

अरे उनाड पावसा जावू नको दूरदेशी,

थोडा थांब ना ईथेच रुजव तू भात-शेती,


आत्ता आत्ता तू आलास जातो लगेच कश्याला,

यंदाच्या या वर्षी ईतका उशीर का झाला ?,


वाट पाहून रे तुझी आम्हा डोळा आले पाणी,

असा पाहू नको आम्हा तुझी दाखव करणी,


तुझ्या संतत धारेने सारे होईल रे लख्खं:,

तुझ्या असीम कृपेने मग विरेल रे दुखः,


बघा पाउस हो आला सारे सारे आनंदले,

पशु, पक्षी वनचर अव्हगे आनंदात न्हाले,


पहा देवाची करणी नित्य देतो आम्हा पाणी,

निसर्गाला जपू चला त्याची ठेवू निगराणी. 

निसर्गाला जपू चला त्याची ठेवू निगराणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational