*आजी*
*आजी*
तूझ नी माझ नात ,
आजी आणि नातीच.
जस दूध आणि दूधावरच्या सायीच...
दूधावरची साय जशी
अलगद उचलावी
तशी मी तूला अलगद
कुशीत घ्यावी....
जितक नाही जपल मुलांना
तितक मी जपते तुला.
तूझ्यात पहाते मी
माझ्या मुलांचे बालपण.....
तुलाच पाहुनी होते
माझी शुभ सकाळ
तुलाच पाहूनी सुखात
जातोय माझा वृध्दापकाळ .....
धावता धावता तुझ्यामागे
विसरुन जाते वयमान माझे,
तुझ्या बोबड्या बोलांनी
गुदगुदी होते माझ्या मनी....
