आली आली ही दिवाळी
आली आली ही दिवाळी
आली आली ही दिवाळी
यंदा आगळीवेगळी
आली आहे ही दिवाळी
घेवुनी फराळ थाळी
सारे मिळून करू या
अंतर्बाह्य स्वच्छता
त्यामुळे होईल खरी
करोनातून मुक्तता
नको फटाक्यांचा धूर
करा प्रदूषणा दूर
दीपोत्सव हा साजरा
घरोघरी होतो खरा
ज्ञानदीप लावू सदा
मिळो आरोग्य संपदा
मिळेल आनंद सदा
हीच प्रार्थना सर्वदा