निसर्ग
निसर्ग
निसर्ग माझा गुरु, निसर्ग माझा मित्र l
निसर्ग सावली सुखाची,निसर्ग वाकुली दुःखाची ll
निसर्ग म्हणतो झाली पहाट, नव्या उपक्रमाची धर तू वाट l
रोज नव्याने सूर्य उगवतो, सोनेरी किरणांची उधळण तो करितो ll
जगण्यासाठी नव्याने आनंद मनी फुलवितो, नित्य नवा रंग मनी खुलवितो l
रोजच्या दैनंदिनीचा सर्वांनाच येतो कंटाळा, निसर्ग करितो का कधी दिनक्रमाचा कंटाळा ll
उन्हाळ्यानंतर येतो पावसाळा, पावसाळ्यानंतर येतो हिवाळा l
ऋतुचक्र तो चालवी हे, कोणासाठीही ना थांबे हे ll
कधी तुझ्या कोपाची उदासी, तर कधी उधळण हर्षाची l
कधी भीती सुसाट वादळाची, तर कधी हलकीशी झुळूक वाऱ्याची ll
