STORYMIRROR

Yogita Takatrao

Classics

3  

Yogita Takatrao

Classics

एक होती मीरा..!

एक होती मीरा..!

1 min
303

एक होती मीरा....

कृष्ण प्रीत प्रिया,

निर्व्याज,आसक्त 

भक्तीचीच क्रिया !.......१


उधळीत बंध....

झाली अध्यात्मिक,

हरी नामे लीन 

त्याग संसारिक !........२


भारावून नाचे....

गावभर साऱ्या,

गीत,भजनांत

दंग तिच्या वाऱ्या !........३


असे कसे कोणी....

टाके ओवाळून, 

जीव अर्पिलेला

कृष्णाची होऊन !.......४


किती दिले कष्ट.....

मरण यातना,

दृष्टांनी मारण्या

परी ना याचना !.......५


खरी भक्त संत....

श्रेष्ठ त्रैलोक्यात, 

एकतारी संगे

सर्वांच्या मनात !........६



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics