STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Classics Inspirational

3  

Ganesh G Shivlad

Classics Inspirational

ऋणानुबंध

ऋणानुबंध

1 min
509

ऋणात राहू ऋणकर्त्यांच्या,

बांधू ऋणानुबंधाच्या गाठी..!

अर्पूनी प्रीत पुष्पे चरणी,

जपू त्यांना शतजन्मी साठी..!


ऋण थोर ते मायमाऊलीचे,

सोसूनी कळा जन्मा घातले..!

पाळणा करुनिया हातांचा,

दिन राती तान्ह्यास जपले..!


ऋण दुसरे ते वडिलांचे,

आयुष्य उभे तेच कष्टती..!

करू सेवा सन्मान तयांचा,

जोवर असू पृथ्वी वरती..!


ऋण तिसरे ते भुमातेचे,

वसुंधरेचे अगणित ते..!

तन मन धन अर्पू तिला,

मोल मातीचे स्मरू नित्यते..!


ऋण चौथे असे गोमातेचे,

क्षीरसागरी पान्हा फुटते..!

प्रत्येक जीवाला सारखीच,

ममता माया अखंड देते..!


ऋण पाचवे माय मराठी,

तोड तिजला जगात नाही..!

तिच्यावाचूनी आम्हा सर्वांचा,

हा जन्मची मुळी जन्म नाही..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics