STORYMIRROR

Chandan Pawar

Romance

4  

Chandan Pawar

Romance

चुंबन...

चुंबन...

1 min
4

माझ्या ओठांचा तुझ्या ओठांशी
फक्त मुक्त संवाद झाला,
चुंबन असं नाव देताच त्याला
बघ किती बोभाटा झाला…

वासनेचा स्पर्श नव्हताच तिथे,
ती आर्त हाक होती भावनांची,
नाजूक गुंफण होती ती,
ओठांनी केलेली ओठांशी…

त्या क्षणात शब्द हरवले सारे,
श्वासांचं नातं मात्र घट्ट झालं,
डोळ्यांतून बोलल्या भावना अनं,
मनाच मनाशी मिलन झालं…

तो क्षण क्षणभरापूरता नव्‍हता
तो संकल्‍प होता साथ देण्‍याचा
आश्‍वस्‍त मनांनी घेतला निर्णय 
आयुष्‍यभर सोबत चालण्‍याचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance