STORYMIRROR

Chandan Pawar

Classics

4  

Chandan Pawar

Classics

तुला विसरू की..

तुला विसरू की..

1 min
1

तुला विसरु की
काळजात रुतलेल्या शब्दांना..!
तूच सांग.. कसे तोडू
नकळत जुळलेल्या बंधांना..!!

तुला विसरु की
तुझ्या गोड हसण्याला..!
तूच सांग.. कसे सोसू
तुझे असून नसण्याला..!!

तुला विसरु की
माझ्यात हरवलेल्या तुला..!
तूच सांग.. उरेल काय अर्थ
विसरल्यानंतरही मला..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics