तुझे ओठ...
तुझे ओठ...
गोड गुलाबी रसाळ
तुझ्या ओठांना सलाम..!
तिथेच माझ्या श्वासांचा
असतो रोज मुक्काम..!!
गुलाबी तुझ्या पाकळ्यांवर
हसू रोज जे उमलते..!
माझ्या कोरड्या ऋतुत
तेव्हांच वसंत बहरते..!!
दातांआड अलगद जेव्हा
ओठ तुझे हरवून जातात..!
माझ्या उरातल्या धगधगत्या
इच्छा तेव्हा जाग्या होतात..!!
तहान माझी जन्मोजन्मीची
तुझ्याच मनभावन स्पर्शासाठी..!
तुझ्या ओठांतील गुलकंद प्यावा
आयुष्यभर जगण्यासाठी..!!
तुझ्या ओठांवर लिहावा
माझ्या प्रेमाचा पैगाम..!
तोवर शिल्लक श्वासांचा
तुझ्या ओठांना सलाम..!!

