सोबती
सोबती
तुझ्या माझ्या नशीबाची रेघ
अशी काही विणली गेली..!
दोन अनोळखी मनांची वाट
काळजाच्या पटलावर विणली गेली..!!
नव्हते माहित मला तुझ्यासारखी
सोज्वळ, सात्विक सोबती मिळेल..!
माझ्या ठेचाळलेल्या नशिबावर
सुगंधी भावनांची वेल फुलेल..!!
नशिबाला दोष देत शोधत
होतो मी अर्थ जगण्याचा..!
पण तू आल्यावर समजला
खरा मार्ग आनंद- सुखाचा..!!
नाही माहित पुढे काय आहे
नशिबाच्या ह्या वळणावर..!
पण विश्वास आहे माझा
फक्त तुझ्याच असण्यावर..!!
