थोडे तरी स्मरा आता..
थोडे तरी स्मरा आता..
' व्हॅलेंन्टाईन डे ' चे आपण
का एवढे गोडवे गाता ?
भगतसिंग-राजगुरू-सुखदेव
थोडे तरी स्मरा आता..!!
' व्हॅलेंन्टाईन ' चा जप करता
तो तर आहे विदेशी..!
' इन्कलाब जिंदाबाद ' घोष
करणारे ते वीर होते देशी..!!
हसत हसत फासावर जाऊन
मुक्त केली तयांनी भारतमाता..!
भगतसिंग-राजगुरू-सुखदेव
थोडे तरी स्मरा आता..!!
नवभारताचे तरुण आपण
सोडू ती पाशवी विकृती..!
मानवतेचे गीत गाऊनी
जपू भारतीय संस्कृती..!!
इतिहासातून प्रेरणा घेऊ
इतिहासचं खरा ज्ञानदाता..!
भगतसिंग-राजगुरू-सुखदेव
थोडे तरी स्मरा आता..!!
देशसेवेचे व्रत घेतलेल्या त्या
वीरांना वाहू आदरांजली..!
राष्ट्रहित-राष्ट्रसंरक्षणाची शपथ
घेऊनी देऊ तयांना श्रद्धांजली..!!
ज्ञानक्रांतीच्या आचार-विचारांनी
भारतात आणू सुख - समृद्धता
भगतसिंग-राजगुरू-सुखदेव
थोडे तरी स्मरा आता..!!
