गंध..
गंध..
येत नव्हता म्हणता म्हणता
तो असा काही बरसत आहे..!
प्रत्येक थेंबासवे तुझ्या प्रेमाचा
गंध मनात दरवळत आहे..!!
ओल्या त्या मंद सरिंमध्ये
तुझाच स्पर्श जाणवत आहे..!
मिटून डोळे प्रत्येक क्षणी
तू मला घट्ट बिलगत आहे..!!
आभाळ भरून आलं जसं
तसं मनही भरून येत असते ..!
तू असतीस जर सोबत माझ्या
स्वर्गाहून सुंदर झाले असते..!!
येत नव्हता म्हणता म्हणता
तो असा काही बरसत आहे..!
आणि नकळत माझं वेडं मन
तुझ्याच प्रेमात भिजत आहे..!!
