वीण दोघातली ही तुटेना..
वीण दोघातली ही तुटेना..
कधी कळतील माझ्या भावना
गुंतलेले मन सावरता सावरेना..!
डोळ्यात अश्रू, ओठांवर हास्य
माझिया सुनुला प्रीत कळेना..!!
दिवसभर तुझ्या आठवणीत मन रमत
रात्रीही डोळ्याला डोळा लागेना..!
किती सांगू तगमग मनाची
माझ्या वेदना तुला दिसता दिसेना..!!
तरीही मन तुझ्या वाटेवर थांबत
थिजलेला श्वासही निघता निघेना..!
कासावीस व्याकूळ जीव नेहमी
वीण दोघातली ही तुटेना..!!
