विद्यार्थी मित्रांनो...
विद्यार्थी मित्रांनो...
वाचन हीच पवित्र ज्ञानगंगा
वाचनाने रुजते विचारधारा..
वाचनातून घडतो सजग माणूस
वाचनच यशाचा लख्ख तारा..
पुस्तक हेच मित्र आपले
संकटातही साथ देणारे...
अंधारलेल्या जीवनवाटेवर
ज्ञानाचा दीप पेटवणारे..
रोज वाचाल एक नवे पान
वाढेल तुमचे ज्ञानभांडार...
विचारांना मिळतील पंख
स्वप्नांना लाभेल नवा आकार..
मोबाईल वेडे होऊ नका
वेळ वाया घालवू नका..
पुस्तकांशी मैत्री करून
ज्ञानसाधनेत मागे राहू नका..
वाचनातून प्रश्न पडतील
प्रश्नांतून उत्तरे मिळतील..
जिज्ञासेच्या सुंदर वाटेवर
यशाची शिखरे गाठता येतील..
डॉ.कलामांचे स्वप्न होते
भारत व्हावा ज्ञानप्रधान..
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वातून
उजळावे देशाचे नाव महान..
चला मुलांनो, संकल्प करूया
वाचनाची गोडी लावूया ..
रोज थोडे वाचत जाऊ
ज्ञानाशी नाळ घट्ट जोडूया..
पुस्तक वाचा, पुढे चला
ज्ञानाची उंच भरारी घ्या..
कलामांचे स्वप्न साकारून
भारताला महासत्तेकडे न्या..
वाचाल तर विचार कराल
विचार कराल तर घडाल..
ज्ञानाच्या बळावर एक दिवस
नक्कीच यशस्वी व्हाल..
