मनप्रीत..
मनप्रीत..
माझ्या मनाच्या कोपऱ्यात
शांतपणे वसलेले स्वप्न तू..
नकळत आयुष्य उजळणारा
सौम्य प्रकाशही तू..
हसण्यात मिसळणारी निर्मळ
निरागस मिश्किलताही तू..
आणि कधी न बोलता
समजून घेणार मौनही तू..!!
मी शोधत नसतानाही
सापडलेली साथ तू..!
स्वामींनी अलगद हातात
ठेवलेली अमूल्य भेट तू..!
भावनांनी ओथंबून गजबजलेले
माझे अंतरंग तू..!
भावनांच्या गोंधळात
जपलेली शांतताही तू..!!
आठवणींच्या ओघात वाहणारं
गोड मधुर गीत तू..!
मनाच्या पानांवर कोरलेल
हळवं गोड नावही तू..!!
क्षणोक्षणी सोबत देणारा
माझा आधारही तू..!
न सांगता काळजी घेणारी
माझी सच्ची ' मनप्रीत ' तू..!!
