जीवनगीत..
जीवनगीत..
तू खळखळून हसून
भरभरून जगावं..!
आयुष्य आपल आहे
म्हणून जशास तसे वागावं.!!
कोणाकडून काही घेतले नाही
कुणाला त्रास दिलाही नाही..!
कोणी तुला नाही दुखवाव
एवढी तू स्वस्त नाही..!!
बरे वाईट बोलले जाईल
नावे ठेवणारे ठेवतील..!
त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी
कामापुरते छान वागतील..!!
पण तू ओळख माणसे
कोण परक आणि कोण खास..!
विवेकने वागून सोड खोट्या
बेगडी प्रेमाचा हव्यास..!!
जग फक्त त्यांच्यासाठीच
जे आहेत सच्चे मनमीत..!
आपला मार्ग आणि प्रवास
आपलेच गा जीवनगीत..!!
