प्रेमपाश...
प्रेमपाश...
तू एकटीने किती आणि का सोसावे ?
पंखात ध्येयाचे बळ घे भरून..!
राहिली नाहीस तू आता अबला
खोटे लोक - व्यक्ती दे झुगारून..!!
तुझा आत्मसन्मान का कुणी दुखवावा ?
एवढी स्वस्त नाहीस दे त्यांना दाखवून..!
बेगडी स्वार्थाचे तोड तू प्रेमपाश
आणि पुन्हा बघ नव्याने जगून..!!
हक्काचा मोकळा श्वास घ्यायला शिक
तुला हसायचे तेव्हा खळखळून घे हसून..!!
मन भरून येईल तेव्हा घे रडून
पण जगण्याचा हक्क घे भोगून..!!
