तू....
तू....
तू ... स्वरात विरघळलेलं गाणं..
मी .. ओठांवर थांबलेलं मौन..
तू .. पहाटेची सुंदर चाहूल..
मी .. उन्हात कोरडं पडलेलं पान..
तू .. आकाशातील चांदण्यांचा शृंगार..
मी .. प्रकाश शोधणारा अंधार..
तू.. सागरातील लाटांचा श्वास..
मी.. किनाऱ्यावर विसावलेलं शिंपलं..
तू.. मोगऱ्याच्या फुलातला नाजूक गंध..
मी.. तुझ्या आठवणींनी दरवळणारं मन..
तू.. नियतीने अलगद जपलेलं स्वप्न..
मी.. ते स्वप्न डोळयांत जपणारा प्रवासी..
तू.. पूर्णत्वाला गेलेली कविता..
मी.. तुझ्यावाचून अपूर्ण राहिलेला शब्द..
तू.. माझ्या अस्तित्वाचा अर्थ..
मी.. तुझ्या नावानं धडधडणारं हृदय..
