मी विचारावं...
मी विचारावं...
मी विचारावं.. येतेय का आठवण..?
आणि तू म्हणावं.. कशातच लागत नाही मन..
मी विचारावं.. बरं आहे का तुझं..?
आणि तू म्हणाव.. तुझ्याविना काय खरं आहे माझं..
मी तुला विचारावं.. बाकी काय..?
आणि तू म्हणावसं.. शून्य तर आहे तुझ्याशिवाय..
मी तुला म्हणावं.. काळजी घेत जा..
आणि तू म्हणावं.. फक्त काळीज जपत जा..
मी म्हणावं.. जग तुझं तू..
आणि तू म्हणावं.. जग तर माझं आहेस तू..
