STORYMIRROR

Chandan Pawar

Romance

4  

Chandan Pawar

Romance

गुलाबी रसाळ ओठ

गुलाबी रसाळ ओठ

1 min
1


गुलाबी पाकळ्यांचा जणू
अधिराज्य तुझ्या ओठांवर...
मधाळ शब्दांची बरसात होते,
तुझ्या प्रत्येक हास्यावर...

रसाळ फळांच्या गोडव्याला
लाजवतील असे तुझे ओठ...
पाहताच त्यांना हरवून जाते,
माझ्या मनाची सारी वाट...

ओठांवरती लाली खुलते,
जणू पहाटेची गुलाबी किरणे...
तुझ्या मंद स्मितात दडलेले,
माझ्या स्वप्नांचे चांदणे...

कधी गुलाबाची पाकळी भासती,
कधी मधुर मधाचे प्याले...
तुझ्या ओठांच्या एका हास्याने,
मनाचे ऋतू बहरून आले...

न बोलताही खूप काही,
तुझे ओठ सांगून जातात...
मौनामधल्या प्रेमभावना,
हळूच मनात रुजवून जातात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance