क्षण निघून गेल्यावर
क्षण निघून गेल्यावर


क्षण निघून गेल्यावर सगळ काही तिथेच थांबते
आणि जस जसे दिवस निघुन जातात तेव्हा सगळ विसरायला ही होते..
कोणी काय बोललं आणि काय विचार करत या वरती आयुष्य घडत नसते
आपण काय सिद्ध करून दाखविले पाहिजे यावरती आयुष्य बनतं जाते..
माणूस हा असा प्राणी आहे जो अस ही बोलतो आणि तसही बोलतच राहतो
आपण इतकं कायम लक्षात ठेवलं पाहिजे आपण स्वतःला किती पाहिजे असतो..
कारण जगात येताना प्रत्येक माणूस हा एकटाच येत असतो आणि मग घडतो
कोणी कोणाचं नसत हे विध्यात्याने नाही तर आपणच सगळ्यांना सांगत फिरतो..
आयुष्यात नेहमी आपली कोण आणि परकी कोण याचा विचार आपण शेवट करतो
म्हणूनच कोणी अचानक निघून गेलं की स्वतःला उगाच दोषी ठरवून मोकळे होतो..
अपेक्षेपेक्षा जास्त ओझ आपण रोज विचार करून आणखी जरा भार पाडत असतो
कोणी चांगल करताना दिसलं की त्याचे पाय खेचतो म्हणूनच हा शेवट असा होतो..