आता निघायला हवं
आता निघायला हवं
कविता केल्या स्वप्नात
सत्यात मी पाहिलं..
मनापासुन ते नातं ही
जपलं निभावलं..
जग मानलं कर्तव्य पार
पाडलं..
जितके दिवस सोबत होती
तिथे ते नातं निभावलं..
खरंच इतकं चुकलं
काय असं घडलं..
प्रेम केलं ते चुकलं
नेमक काय करायचं राहिलं..
एकतर्फी होतं म्हणुन तर
पाठी वळून नाही पाहिलं..
खोटं होत वागणं बोलणं
तात्पुरत तरी खरं राहिलं..
हृदय परत एकदा तुटलं
उरलं सुरल ते खोटं वाटलं..
ज्याला जग मानलं
त्यांनीच नकळत एकट सोडलं..