STORYMIRROR

Priti Dabade

Action Inspirational Others

3  

Priti Dabade

Action Inspirational Others

शहीद

शहीद

1 min
368

सलाम त्या मातेला

जिचा शहीद होतो पुत्र

घालमेल त्या भार्येची

जेव्हा काढावे लागते मंगळसूत्र


सदैव तत्पर असतात निधड्या छातीने

गोळ्यांचे वार सहन करण्यासाठी

जावे लागते अर्ध्यावर सोडून

आयुष्य देशरक्षणासाठी


समाधान असते मनी

देशाच्या कामी येण्याने

दुःख एवढेच असते

काय होईल आपल्या जाण्याने


शौर्यचक्र दिले जाते

वीर मरणाचा ठेवून मान

पण डोळेच नसतात 

बघायला ती शान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action