लाॅकडाऊनमधील भारतीय तरुण
लाॅकडाऊनमधील भारतीय तरुण
महाभयंकर कोरोना विषाणूचं
संकट आलं जगावर,
सरकारने मग भर दिला
लाॅकडाऊन करण्यावर ॥१॥
परिणामी सारे तरुण
घरी बसूनी राहिले,
असे कंटाळवाणे जीवन
त्यांच्या वाट्याला आले ॥२॥
दिवसभर टी.व्ही मोबाईल
हेच विश्व त्यांचे बनले,
यांच्याविना काहीही
त्यांना सुचेनासे झाले ॥३॥
कामधंदाही ना हाती
भर बेरोजगारीत झाली
उपाशीपोटी मरण्याची
वेळ तरुणावर आली ॥४॥
शाळा-काॅलेज बंद पडून
अभ्यासाचं नुकसान झालं,
आॅनलाईन
शिकवलेलंही
मुलांना कळेनासं झालं ॥५॥
संधी लाभली तयांना
सुप्त गुण ओळखण्याची,
वेळ मिळाला तयांस
चालना मेंदूला देण्याची ॥६॥
कुटूंबातील सदस्यांशी
मोकळेपणाने वावरु लागला,
नवनवीन कला शिकण्याचा
त्याने छंद जोपासिला ॥७॥
घरोद्योगाची चालना मिळता
स्वतः व्यवसाय सुरु केला,
छोटे-मोठे काम करत
लघुद्योग वाढीस लावला ॥८॥
अशा लाॅकडाऊनने त्या
नुसतं नुकसान नाही केलं,
माणसातली माणुसकी जपत
सजग माणूस घडविलं ॥९॥