गुरुजी...
गुरुजी...
1 min
498
अहो गुरुजी,
किती छान वाटतं ना हो
तुम्हाला गुरुजी असं म्हणायला,
कारण सर नाही येत हो
तुम्हाला सर म्हणून बोलायला.
अनोळखी आपण दोघेही
मनमोकळेपणाने नांदतो हो,
ज्ञानरुपी या शाळेमध्ये
एकत्र संसार थाटतो हो.
गुरु-शिष्याचंं नातं आपलं
पण मित्राप्रमाणे वागता हो,
चुकीच्या मार्गाचे विचार छाटून
ज्ञानाची शिदोरी वाटता हो.
अथांग अशा या ज्ञानसागरात
पोहायला तुम्ही शिकवलंत हो,
आयुष्याच्या उत्तुंग प्रवासात
सरळमार्गी धावायचं दाखवलंत हो.
कसे फेडू हे पांग सारे
आता कळतंच नाही मला हो,
उंच भरारी नक्कीच घेईन
पण साथ तुमची असू द्या हो.