_संपलाय अंधार हा _
_संपलाय अंधार हा _
1 min
478
संपलाय अंधार हा
गेला सांगूनी जगाला,
नको करु रे रवंथ
विसर रे भुतकाळा. ॥१॥
संपलाय अंधार हा
बाळ निजूनीया गेला,
दोर आईच्या हातात
झुला झोक्यात झुलला. ॥२॥
संपलाय अंधार हा
शशी उजाळून आला,
देई उजेड रातीला
तारकाही या साथीला. ॥३॥
संपलाय अंधार हा
स्वप्न दाखवी उद्याचे,
घाली विरझन दुःखा
दिस आणितो सुखाचे.॥४॥
संपलाय अंधार हा
रवि माथ्यावरी आला,
नव्या दिसाची पहाट
करी सुकर जनाला. ॥५॥
संपलाय अंधार हा
संधी लाभली जीवाला,
धरु उन्नतीचा मार्ग
दिशा देऊ विकासाला. ॥६॥
संपलाय अंधार हा
साथ देऊ सार्याजणा,
घेऊ हातामध्ये हात
राहू एकीने जीवना. ॥७॥