आली आली दिवाळी आली
आली आली दिवाळी आली
आली आली दिवाळी आली
सोबत समृद्धी घेऊन आली
दुःखावरती करून मात
सुखाची रास घेऊन आली
आली आली दिवाळी आली......
नव्या पर्वाची करून सुरवात
सादर व्हावे नव्या जोमात
निराशेवर करून मात
आशेचा किरण घेऊन आली
आली आली दिवाळी आली.....
सकारात्मक उर्जा निर्माण झाली
उत्साहाने स्वागताची तयारी केली
सुख समृद्धीची विनवणी करून
लक्ष्मी पावलांनी घरात आली
आली आली दिवाळी आली....
उजळून टाकला आसमंत सारा
हवेतला तो मुक्त संचार सारा
नवचैतन्य सार्यांनी अंगीकारण्या
अभ्यंगस्नानाची वेळ झाली
आली आली दिवाळी आली......
