स्वातंत्र्य दिन
स्वातंत्र्य दिन




स्वातंत्र्य दिनाचा सोहळा
भाषणांची आतषबाजी
देशभक्तांच्या त्यागाची
आठवण करी ताजी
राष्ट्रध्वज फडकविला जातो
देऊन त्यास सलामी
भारतभूमीच्या समृद्धीसाठी
आखुनी योजना आगामी
केशरी पांढरा हिरवा
सजतो रांगोळीत
दृश्य ते चैतन्य
जागवते मनामनात
सांस्कृतिक कार्यक्रम
वाढवी उत्सवाची शोभा
हाच तर खरा भारताच्या
एकात्मतेचा गाभा